free education scheme in maharashtra
आपल्या भारतीय समाजामध्ये शिक्षणाला आणि त्या सोबत माणुसकीला खूप महत्व दिल जात. आता या दोन विषयांना एकमेकाशी जोडलं तर किंवा दोन्ही विषय एकाच ठिकाणी कोठे दिसतात? …. असा प्रश्न कोणी विचारला तर त्याच बरोबर उत्तर मिळत ते म्हणजे ‘शाळेत’ . तुम्ही वाचक मंडळी आश्चर्याने डोळे वैगेरे वटारून पाहाल कि हा काय लिहितोय !
तर होय ! अगदी खरंय, शाळेतच शिक्षण आणि माणुसकी या दोन्ही विषयांची जडणघडण होने अपेक्षित आहे !
आपल्या भारत देशावर इग्रजांनी अनेक वर्ष राज्य केल सत्ता गाजवली पण त्या निष्ठुर इग्रजांनी शाळा फ्री मध्ये चालवली( त्यांचा उद्देश वेगळा असेलही) पण शिक्षण फ्री मध्येच होत. आज आपण स्वतंत्र भारतात राहतो पण इथे आपल्याच लेकराना पैसे देऊन शिकवावं लागत! शाळेचे पैसे देण्यासाठी पालकांना उशीर झाला तर लेकरांना परीक्षेला बसू दिल जात नाही. शिक्षण सम्राटांचा चालू असलेला मनमानी कारभार याला शासनाचा कसलाच हस्तक्षेप नाही, तर पाठींबाच आहे असे स्पष्ट मत मांडायला काहीच हरकत नाही !
आजच्या सामान्य नागरिकांना प्रश्न पडतो ! सध्याच्या राजकारण्या पेक्षा इंग्रज चांगले होते का?
आजची महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था पाहिली तर ती पूर्णतः व्यवसाय बनलेली आहे. या शिक्षण व्यवस्थे मधून तुम्ही तुमची लेकर संस्कारी आणि पुढील आयुष्यात प्रामाणिक निघण्याची अपेक्षा कशी ठेऊ शकाल?… ज्या शाळेतच पैसे घेतल्या शिवाय प्रवेश नाही आणि त्यांच्या पालकांना जरासा उशीर झाला शाळेची फीस भरण्यासाठी, तर शाळा त्यांच्यावर अमानुष झळ करते ! जर असच चालू राहील तर पुढील पिढी प्रामाणिक निघणार नाही, भ्रष्ट लाचखोर आणि पैशा शिवाय काम न करणारी पिढी तयार होणार यावर दुमत असण्यार्यांची शक्यता कमीच असणार !
आपल्या महाराष्ट्राला एक मोठा आणि सांस्कृतिक इतिहास आहे, याच सांस्कृतिक इतिहासाला जोडून पूर्वजांकडून किंवा गुरूजणांकडून शिक्षण घेऊन किंवा त्या गुरुजनांच्या कृतीचे अनुकरण करूनच विद्यार्थी वर्ग समाजात वावरत असतो ! आता आजच्या शैक्षणिक वातावरणाला पाहून तुम्हाला तुमच्या वरील प्रश्नाचे उत्तर मिळालेच असेल ! ज्या विद्यार्थ्यांचे गुरुजीच शिक्षण सम्राटांच्या आदेशावर शिक्षणाला दुय्यम आणि पैशाला प्रथम प्राधान्य देतात त्यां शिक्षकान कडून विद्यार्थ्यांनी काय शिक्षण घ्यावे ?
महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात वाढत असलेले व्यवसायी करणाला शासन जबाबदार !
होय हे अगदी खरंय! इंग्रज बाहेर देशातील असूनही त्याना भारतीय शिक्षण व्यवस्था सुधारावीशी वाटली. पण महाराष्ट्रातील राजकारण्यांना स्वतः च्या शाळा महाविद्यालये काढून त्याना भरमसाट फीस आकारून शिक्षण क्षेत्राचे वाटोळे करावे वाटले ! महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील प्रगती पाहिली असता इथे ज्ञानदानाचा विषय हा कमाई करण्याच्या विषयाच्या नंतर येतो !
आज पर्यंत महाराष्ट्रातील ज्याज्या राजकीय पक्षांनी सत्ता भोगली त्या सर्व पक्षांच्या नेतेमंडळीची किंवा त्यांच्या नातलगांच्या शिक्षण संस्था आपणांस महाराष्ट्रात पहायला मिळतील आणि विशेष म्हणजे यातल्या कोणत्याच संस्था या पूर्णतः ज्ञानदानाचे मोफत काम करीत नाहीत, त्यातील काहींनी शिक्षण भरती आणि विद्यार्थ्यांच्या बोगस प्र्वेशामधून आपली आर्थिक उन्नती साधली तर काहींनी शिक्षण सेवेत ज्ञानदानासाठी पात्र लोकानां वगळून आपल्याच अपात्र लोकाना पात्र करून नातलगांच्या पोटापाण्याची सोय केली !

माझ्या पुढील लेखात वाचा नवीन विषय “मंग आता शिक्षण शिकून तुमची लेकर समाज घडवतील हि अपेक्षा ठिवा बाजूला !”