Aam Aadmi Party warje Vahak Din
Aam Aadmi Party Waraje च्या वतीने वाहक दिन ( Vahak Din ) या निमित्ताने Aam Aadmi Party Waraje च्या वतीने वारजे विभागात साजरा करण्यात आला.
भारता मध्ये प्रत्येक वस्तू ,सेवा एका ठिकाणावरून दुसर्या ठिकाणी ने-आन करण्यासाठी वाहकांचा उपयोग केला जातो. दिनांक 17 सप्टेंबर रोजी वारजे येथील आम आदमी पार्टीच्या वतीने PMPML, रिक्षा, सहा चाकी रिक्षा, टेम्पो, झोमॅटो, टँकर,स्कूल बस,ओला या सर्व वाहनांच्या 100 पेक्षा जास्त वाहकांचा यावेळी आम आदमी पार्टीच्या ( Aam Aadmi Party ) वतीने श्री पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

“संपूर्ण जगामध्ये एका ठिकाणची वस्तू दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी वाहक हा खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतो, त्यामुळे काल 17 सप्टेंबर हा त्यांचा दिवस साजरा व्हायलाच पाहिजे म्हणून ‘आम आदमी पार्टी, वारजेच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार
घेऊन हा दिवस वारजे येथे मोठ्या उत्साहात पार पाडला ! या जगात प्रत्येकाला सन्मान मिळाला पाहिजे आणि त्यांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आपण त्यांचे आभार व्यक्त केले पाहिजेत, असे या सत्काराचे वेळी विभागाचे अध्यक्ष निलेश वांजळे ( Nilesh Wanjale ) यांनी आपले मत व्यक्त केले !

यावेळी रॉबिन जेम्स, सदाशिव वांजळे, गोपीनाथ जोशी, पवन जाधव, दीपक वांजळे, संदेश सोलेकर, सुरेखा भोसले, लक्ष्मण कडू, संतोष सांबरे आदी आम आदमी पार्टी, वारजे ( Aam Aadmi Party, warje ) चे कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.