Aam Aadmi Party Pune
आपल्या भारत देशा मध्ये विविध जाती- धर्माचे लोक राहतात आणि त्यांचे बरेच सन-समारंभ सुद्धा असतात. या सर्व सणासुदीच्या काळात शांतता सुव्यवस्था राखली जावी जोपासली जावी या साठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या, आपल्या सुखाच्या क्षणामध्ये अडथळा येऊ नये म्हणून लक्ष देणार्या ( Police Department Pune ) पोलिसांकडे आपल लक्ष असत का हो ?
….जाहिरात….
Aam Aadmi Party Pune चे कार्यकर्ते पोहचले फुलांचे गुच्छ घेऊन पोलीस स्टेशन मध्ये !
सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी प्रतेकाने आपले योगदान दिले पाहिजे पण प्रत्येक वेळी सर्वांना हे शक्य होईलच असे नाही. समाजामध्ये काही लोक किंवा शासकीय यंत्रणा अशा आहेत ज्या त्यांची भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडत आहेत, मग त्यांना आपल्या कडून एक Thanks जायला नको का ?
आपण केलेल्या एखाद्या कामाची दुसऱ्याने निस्वार्थपणे केलेली स्तुती हि पुढील कामा मध्ये, उर्जेच काम करते. हिच भावना लक्षात ठेऊन Aam Aadmi Party Pune चे कार्यकर्ते पोहचले फुलांचे गुच्छ घेऊन पोलीस स्टेशन मध्ये !

Police Department Pune मुळेच नागरिकांना गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करता आला.
पुणे- येरवडा विश्रांतवाडी पोलीस स्टेशन च्या अंतर्गत येणाऱ्या सर्व भागांतील नागरिकांना गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करता यावा यासाठी पोलीस प्रशासनाने मोठी कसरत करत, फौजफाटा लावत चोवीस तास सुरक्षा व्यवस्था दिल्याबद्दल Aam Aadmi Party Pune तर्फे विश्रांतवाडी पोलीस स्टेशन ( Vishrantwadi Police Station ) गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मा.भालचंद्र ढवळे व शास्त्री नगर पोलीस स्टेशन चे ( Shastri Nagar Police Station Pune ) पोलीस निरीक्षक मा.रवींद्र कुमार वारगुंडे साहेबांना शाल पुष्पगुच्छ देऊन पोलीस प्रशासनाचे आभार मानले.

यावेळी पोलीस प्रशासनाचे सर्व पदाधिकारी पोलीस अंमलदार मा. देविदास वंढारे, अंमलदार मा. साईनाथ मस्के, पोलीस मित्र फय्याज शेख, पोलीस निरीक्षक मा सत्यवान गेन उपस्थित होते.
या सत्कार प्रसंगी आम आदमी पक्षाचे पुणे शहर युवक आघाडीचे अध्यक्ष मा.अमित म्हस्के ( Amit Mhaske ) पुणे शहर संघठण सहमंत्री मा.मनोज शेट्टी ( Manij Shetty ) विजय लोखंडे, मयुर कांबळे, प्रताप म्हस्के, नितेश विश्वकर्मा, चेतन बेळमकर आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
slide-anything id=’102′