Aam Aadmi Party Pune Team

Aam Aadmi Party Pune Team

दिल्ली आणि पंजाब ( Aam Aadmi Party Delhi And Punjab Work ) मध्ये उल्लेखनीय कामकाज करून जनतेच्या मनावर ‘ कार्यक्षम सरकार’ अशी ओळख मिळवलेल्या आम आदमी पार्टी ची आता पुणे शहर आणि महाराष्ट्रातील राजकारणात मोर्चे बांधणी होत असलेली दिसते आहे.  काही दिवसापूर्वी सुदर्शन जगदाळे ( Sudarshan Jagadale ) यांची पुणे शहर अध्यक्ष पदी नियुक्ती केल्यानंतर दिनांक १२/१०/२०२३ रोजी  Aam Aadmi Party Pune यांच्या वतीने सुशिक्षित आणि कार्यक्षम व्यक्तींचा पद ग्रहण सोहळा पार पडला ( Aam Aadmi Party Pune Team ).

IT क्षेत्रातील नामांकित कंपनीचा जॉब सोडून समाजाची सेवा करण्याचा निर्धार केलेले ‘ आप ’ पुणे ( Aap Pune ) अध्यक्ष.

सद्या नौकरीच्या शोधात असलेले अनेक तरुण-तरुणी आपणास दिसत असतील किंवा आईकन्यात पण येत असतील, चांगल्या पगाराची IT क्षेत्रातील नोकरी सोडून सामाजिक कार्याचा वसा घेतलेला एक तरुण आपणास ‘आम आदमी पार्टी, पुणे शहर’ ( Aam Aadmi Party Pune President ) च्या अध्यक्ष स्थानी दिसेल !  आपल्याला भारतातील सामान्य नागरिक हे सामान्य विचार करून नोकरी किंवा धंदा या गोष्टी मध्येच अडकून राहतात आणि ज्या क्षेत्रामुळे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, वैदकीय इत्यादी यंत्रणा जुडल्या आहेत त्या मुख्य क्षेत्राला सुशिक्षित व प्रामाणिक लोक दुर्लक्ष करतात त्या मुळे अशिक्षित, भ्रष्ट लोकांची संख्या राजकारणात वाढत आहे या गोष्टीची जाणीव झाल्यामुळे सुदर्शन जगदाळे ( Sudarshan Jagadale ) यांनी IT क्षेत्रातील नामांकित कंपनीचा जॉब सोडून, बदल घडवण्याच्या उद्देशाने समाजाची सेवा करण्याचा निर्धार केला आणि राजकारण क्षेत्र निवडल .

Aam Aadmi Party Pune Team मध्ये 80% पदाधिकारी उच्चशिक्षित आणि सामान्य कुटुंबातील.

 “समाज  बदलण्यासाठी अगोदर स्वतः मध्ये बदल घडून आणणे गरजेचे आहे.”  हे वाक्य आपण अनेक वेळा ऐकल किंवा वाचल असेल पण जर या वाक्याच अनुकरण केलं तर समाज बदलण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही ! Aam Aadmi Party Pune Team ची संख्या आणि त्यातील सुशिक्षितांची संख्या पाहिली तर वरील वाक्य Aam Aadmi Party Pune च्या नवनियुक्त पदाधिकारी निवडीने स्पष्ट झाले आहे !

आम आदमी पार्टी, पुणे शहर यांनी पैसा प्रतिष्टा याला महत्व दिले नसून प्रामानिक आणि सुशिक्षितांना पार्टी वाढीसाठी आणि समाजसुधारण्याच्या कामाची जबाबदारी दिली असल्याचे दिसते आहे.

Aam Aadmi Party Pune हि Pune Mahanagar Palika ( पुणे महानगरपालिका ) निवडणूक लढणार आणि जिंकणार अजित फाटके पाटील  ( Ajit Phatake Patil )

आम आदमी पार्टी ने दिल्ली ( Aam Aadmi Party Delhi )  मध्ये चालू असलेल्या प्रामाणिक प्रगतीशिल कामांच्या जोरावर पंजाब मध्ये सत्ता मिळवली आणि आता महाराष्ट्राचा नंबर असल्याचे अजित फाटके पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले ( Ajit phatake patil speech ) महाराष्ट्राचा मतदार सुजाण आहे आणि त्यांचा अरविंद केजरीवाल तसेच त्यांच्या कामावर विश्वास आहे, आता गरज आहे ती आपण (  आम आदमी पार्टी ने  ) जनतेमध्ये पोहचण्याची असे मत अजित फाटके पाटील यांनी मांडले ! 

Maulana Abul Kalam Azad Memorial Hall येथे मान्यवरांच्या उपस्थितीत नवनियुक्त पदाधिकारी यांचा पद ग्रहण सोहळा !

सदरील सोहळा मौलाना अबुल कलाम आझाद मेमोरियल हॉल (  Maulana Abul Kalam Azad Memorial Hall ) बर्निंग घाट रोड, कोरेगाव पार्क, पुणे येथे संपन झाला सदरील सोहळ्या मध्ये पुणे शहरामध्ये विविध आघाडी व सेल तयार करण्यात आले आहेत तसेच पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले, या वेळी मा.अजित फाटके पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले  या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती, महाराष्ट्र प्रदेश संघटक  मा.अजित फाटके पाटील , वरिष्ठ नेते मा.मुकुंद किर्दत पुणे शहर अध्यक्ष मा. सुदर्शन जगदाळे  महिला अध्यक्षा मा. सुरेखाताई भोसले तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *