हडपसर मध्ये ‘आम आदमी पार्टीच्या वतीने आदर्श पत्रकार व आदर्श सेनानी सन्मान सोहळा पार पडला. Aam Aadmi Party Hadapsar 26th jan Program ‘Adarsh journalists and Adarsh Senani’
प्रजासत्ताक दिना निमित्त आम आदमी पार्टीच्या, हडपसर, पुणे च्या वतीने आयोजित आदर्श पत्रकार व आदर्श सेनानी सन्मान सोहळा पार पडला.

दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11:00 च्या सुमारास संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिर, काळेपडळ पोलिस चौकी शेजारी, काळेपडळ येथे हडपसर भागातील आम आदमी पार्टीचे इच्छुक उमेदवार सचिन कोतवाल ( Sachin Kotwal ) , दीलीप गायकवाड ( Dileep Gaikwad ) , अस्मिता मांढरे ( Asmita Mandhare ) , अशोक हरपळे( Ashok Harpale) व अध्यक्ष शैलेश जाधव ( Shilesh Jadhav ) यांच्या वतीने हडपसर, पुणे परिसरातील आदर्श पत्रकार व आदर्श सेनानी यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन कोतवाल यांनी केले तर कार्यक्रमाची रूपरेषा आणि सूत्रसंचलन दिलीप गायकवाड यांनी केले. ( aam aadmi party pune news in marathi )

उपस्थिती आदर्श पत्रकारांच्या वतीने राजू शिंगाडे, अशोक बालगुडे यांनी मनोगत व्यक्त केले, तर व्यासपीठावरील मान्य वरापैकी ज्येष्ठ पत्रकार सुभाष भारद्वाज यांनी भाषणात पत्रकारांना पत्रकारिता कशी करावी व ती करत असताना कोणती काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन केले.

त्यानंतर उपस्थित 5 आदर्श सेनानी व 50 पेक्षा जास्त आदर्श पत्रकार यांचा सन्मानचिन्ह व पत्रक देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन मुकेश वाडकर यांनी केले.

Aam Aadmi Party Hadapsar 26th jan Program 'Adarsh journalists and Adarsh Senani'

या कार्यक्रमामध्ये आम आदमी पक्षाचे पुणे शहर समन्वयक डॉ अभिजीत मोरे, सुजित अग्रवाल उपस्थित होते, त्यांनी पत्रकारां समोर आम आदमी पक्ष्याची भूमिका मांडली, याच बरोबर अक्षय कोळपे, परशुराम घनवट व इतर अनेक कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *