Jaggu Ani Juliet Marathi Movie
Jaggu Ani Juliet Marathi Movie
नायक आणि नायिका यांच्या नावावरच असलेला हा चित्रपट ज्या प्रमाणे पोस्टर वरती प्रवासी दिसतो आहे, तसाच हा प्रवास चित्रपटा मधेही पाहायला मिळतोय! व्हॅलेंटाईन सुरु असलेल्या आठवड्यात सिनेमा प्रदर्शित झाला म्हणजे नक्कीच प्रेमसंबंधा वरती आधारित असेल असा अंदाज तुम्ही बांधला असेल तर जरा थांबा, कारण पोस्टर आणि ट्रेलर तुम्हाला हा अंदाज बांधण्याची परवानगी देत असतीलही पण सिनेमा पाहताना खूप वेगळा अनुभव येतो !
होय ! म्हणजे हा चित्रपट फक्त प्रेमसंबध दाखवणाराच नाही तर त्या सोबत नाते संबंध कसे टिकवले पाहिजेत हे सांगणारा सुद्धा आहे !
” प्रवास हा फक्त एका ठिकाणा वरून दुसऱ्या ठिकाणी जाणे एवढाच नाही, तर एका मनातून दुसऱ्या मनामध्ये जाऊन (प्रवास करून ) तेथे आपल वास्तव निर्माण करणारा हा सिनेमा आहे किंवा हेच हा सिनेमा सांगतो. ” अस म्हटल तर चुकीचं ठरणार नाही!….
मुंबई मधल्या राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कोळ्याला सहलीच्या तिकिटा मधे ५०% डिस्काउंट मिळाला म्हणून त्याने जिवापेक्षा प्रिय असलेल्या आपल्या पोराला सहलीच्या निमित्ताने उत्तराखंड म्हणजेच देवभूमी मद्ये पाठवले आहे, पण सहली दरम्यान सोबत चे सहकारी वयस्कर असल्या मुळे आणि एकटाच तरुण त्या कोळप्यात अडकल्याची भावणीक्ता निर्माण झाल्याने ४ दिवस असलेल्या त्या शहरातील मुक्काम हा बाहेर घालवण्याचे ठरवतो आणि त्याचा उद्देश सुधा साध्य होतो. जग्गू ला जुलियट मिळते आणि उत्तराखंड मद्ये सुरू होतो हा प्रेमळ वाटणारा प्रवास पोस्टर मद्ये दिसत असलेल्या बुलेट वरती.
सुंदर दिसणारी नाईका ( Vaidehi Parashurami ) बोलते सुद्धा सुंदर कारण चितळे असली तरी अमेरिकेत वाढली आहे. चित्रपट हा सहली वरती असल्या मुळे इतर कलाकार सुद्धा ( उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, समीर धर्माधिकारी, समीर चौघुले, अविनाश नारकर, सुनील अभ्यंकर, रेणुका दफ्तरदार, जयवंत वाडकर, सविता मालपेकर, अंगद म्हसकर, अभिज्ञा भावे आणि मनोज जोशी ) आहेत पण त्यांच्या कलागुणांना वाव द्यायला कथा कमी पडतेय असं वाटत. मुख्य भूमिकेत अमेय वाघ बरच प्रेक्षक वर्गाचं लक्ष आकर्षित करतोय .
संपूर्ण फॅमिली सोबत बघणार असाल आणि भावनिक मराठी चित्रपटाचे चाहते असाल तर वेळ काढून नक्की ( Jaggu Ani Juliet Marathi movie ) पहा.
दोन गाणी चांगली धिंगाणा घालणारी मोठ्या DJ वरती आदळू शकता अशी आहेत. खास करुन मना आणि कधी ना तुला अतिशय सुंदर आहेत !
शेवटी असही वाटत की याचा पुढील भाग सुधा येतो की काय ?